करमाळा (सोलापूर) : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले. यावेळी सुभाष ओव्हळ, देविदास भोसले, विशाल लोंढे, संभाजी कांबळे, शिवाजी भोसले, एकनाथ शिंदे, दादासाहेब भोसले, ब्रह्मदेव काळे, आण्णासाहेब महनवर, सचिन घोडके संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
