मानाची सवारी नालसाहेब यांच्या समोरील स्वच्छता करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : मोहरमनिमित्त (ताजिया) करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम धर्मातील मानाची प्रमुख सवारी नालसाहेब यांच्या समोरील परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 6 जुलैला मोहरम आहे. परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. सवारीच्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडचणी येणार आहेत. मोहरमपूर्वी येथील संपूर्ण परिसर स्वच्छ करावा व भाविकांची अडचण दुर करावी, अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, इमित्याज पठाण, जहाँगीर बेग, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *