उपमुख्यमंत्री पवार यांचे डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्याबाबत स्पष्टीकरण

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कारवाईबाबतचा व्हिडिओ कॉल सध्या प्रचंड चर्चेत असून याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. कुर्डू येथे मुरूम वाहतूक प्रकरणात कारवाईसाठी गेल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री पवार यांचा कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन आला होता. दरम्यान त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केली होती. याचे रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी महिला अधिकाऱ्यांना कारवाईपासून रोखले. त्यांना धमकवले असेही म्हटले होते. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलिस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *