करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन व धम्मदीक्षा कार्यक्रम झाला. बौद्धाचार्य सावता हरी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्र परिवर्तन दिन व धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कार्यक्रम झाला.
करमाळा शहरात धम्म रॅली काढून धम्मचक्र परिवर्तन दिनाची सांगता करण्यात आली. सिद्धार्थ नगर, भिम नगर, सुमंत नगर येथील लेझीम संघ, युवा भीम नगर, आंबेडकरवादी चळवळमधील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार माजी सामनेर रितेश कांबळे व सुहास ओहोळ मानले. भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने हे कार्यक्रम झाले.