सोलापूर : दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणून सरकारच्या विविध योजनेच्या लाभ मिळावेत यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र त्यांना सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबविण्यात आले होते. त्यातून जिल्ह्यातील १२ हजार ६६६ पात्र लाभार्थींना विशेष प्रमाणपत्राचे घरपोच वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील १ हजार १४० लाभार्थी आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा समाजकल्याण अधिकार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मिशन इन्स्टिट्यूट ट्रेनिंग रिसर्च अँड एक्शन (मित्र) संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत, सचिव संजय पुसाम यांच्या सहकार्याने ही मोहिम राबविली होती.

या मोहिमेची तिन टप्प्यांत विभागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात गटविकास अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, आशा ताई, अंगणवाडी सेविका, समग्र शिक्षण अभियान, राष्ट्रीय बाल विकास प्रकल्प, पालक संघटना, दिव्यांग व्यक्तींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे सहकार्य लाभले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ज्या व्यक्तींजवळ नविन दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही अशा १५ हजार ६६६ दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती प्राप्त केली. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत ०-१८ वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या १ हजार १० बौधिक अक्षम बालकांसाठी ४३ बुध्दीगुणांक प्रामथिक तपासणी शिबिरे घेण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ३८ दिवसांत २५ शिबिरांची मोहिम यातून राबविली गेली. विशेष म्हणजे यात तब्बल १५ हजार ६६६ दिव्यांग बांधवांची प्राथमिक तपासणी पूर्ण होऊ शकली. यातून पात्र ठरलेल्या १२ हजार ६६६ लाभार्थी दिव्यांग बांधवांना ६० ते ९० दिवसांमध्ये आता दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध होऊ शकणार आहे.

केंद्रिय सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या पुढाकारातून २०१८ मध्ये जिल्हा पातळीवर युनिव्हर्सल आयडी फॉर डिसॅबलिटी (युडीआयडी) प्रणाली सुरू झाली. २०११ च्या जनगनणेनुसार सोलापूर जिल्ह्यात १ लक्ष १६ हजार दिव्यांग व्यक्ति आहेत. ज्यामध्ये ६८ टक्के ग्रामीण भागात तर ३२ टक्के शहरी भागात राहतात. या मोहिमेच्या माध्यमातून सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाने मागील गेल्या पाच वर्षांत फक्त ४० हजार दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले गेले. ही प्रक्रिया करताना तपासणी, निदान, प्रमाणपत्रासाठी किमान ३ ते ४ वेळा दिव्यांगांना जिल्हा मुख्यालय गाठावे लागत होते. मात्र जिल्हा प्रशासन आणि मित्र स्वयंसेवी संस्थेच्या संवेदनशील पुढाकारातून पाच महिन्यांत राबविलेल्या मोहिमांमधून दिव्यांग बांधवांना एकाच भेटीत जिल्हा मुख्यालयाऐवजी तालुका पातळीवचर दिव्यंगत्वाचे निदान शक्य झाले.

दिव्यांग अस्मिता अभियानांतर्गत तपासणी आणि निदान करून प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले तालुकानिहाय दिव्यांग बांधव पंढरपूर : ९५७, अक्कलकोट : १३३७, बार्शी : ११५०, माळशिरस : १३१०, सांगोला : १२९०, करमाळा : ११४०, मोहोळ : १३६०, माढा : ८०४, मंगळवेढा : ६१०, सोलापूर (दक्षिण) : ७९०, सोलापूर (उत्तर) : ४१० असे ११ हजार १५८ तसेच काही लाभार्थींना जिल्हा पातळीवर रेफर करण्यात आले आहे. त्यातून संभाव्य १५०८ लाभार्थी पात्र होऊ शकतात.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *