यशस्वी इंजिनिअर होण्यासाठी स्वतःमध्ये इंजीनियरिंग एटीट्यूड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ISTE न्यू दिल्ली चे चेअरमन व अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे झालेल्या दीक्षारंभ कार्यक्रमात बोलताना केले.
म्हणाले, विदयार्थांनी यशस्वी होण्याकरिता औद्योगिक कौशल्य आत्मसात केले पाहिजे व आपल्यातील कलागुणांना सतत वाव दिला पाहिजे. विद्यार्थांनी नोकरी करण्याबरोबरच, व्यवसाय, उदयॊजक व संशोधन कार्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्वागत व दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) च्या स्टुडन्ट चाप्टर MH-323 च्या अंतर्गत घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (BIDA)चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी भूषविले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन प्रातिनिधिक स्वागत केले. या वेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. धनंजय जामदार यांनी नवीन विद्यार्थ्यांना उद्योजक जगाची ओळख करून दिली व यशस्वी उद्योजक होण्याकरिता जिद्द आत्मविश्वास व चिकाटी याची गरज असते, असे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील द्वितीय वर्षाची संगणक अभियांत्रिकीची विद्यार्थिनी रसिका कोकाटे हिने आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख दिनेश सावंत यांनी धनंजय जामदार यांची डिपार्मेंटल ऍडव्हायजारी बोर्ड (DAB) कमिटी वर स्टेकहोल्डर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली व त्यांना दिनेश सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या कार्यक्रमास बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे डायरेक्टर अभिजीत शिंदे तसेच विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संगीकर, महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्राध्यापक डॉ. संजय कदम हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली काळे, विद्यार्थी भक्ती राऊत, यश मदने यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी वैष्णवी राऊत यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता विद्या प्रतिष्ठान पोलिटेक्निक कॉलेजच्या ISTE चाप्टरचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ चिकणे तसेच सेक्रेटरी प्रा. रोहिणी गोरे व स्टुडंट चाप्टरचा अध्यक्ष ओम मिठारे यांनी सहकार्य केले.
या दीक्षारंभ कार्यक्रमास ३०० विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.