करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय वर्तुळात उमेदवारांबाबत चर्चाही सुरु आहेत. कोणता राजकीय गट कशी व्यूहरचना आखतो हे पहावे लागणार आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कोणत्या प्रभागात कोणता भाग? करमाळ्याची लोकसंख्या किती? किती नगरसेवक आहेत? असे अनेक प्रश्न आहेत. याबाबत ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलची ही विशेष स्टोरी आहे…

करमाळा नगरपालिका हद्दीतील लगतच्या जनगणनेनुसार २३ हजार १९९ लोकसंख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीची ३५३५ व अनुसूचित जमातीची ४३० लोकसंख्या आहे. करमाळा शहराचे २१ हजार ५१६ मतदान आहे. त्यातून १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडणूक द्यायचे आहेत. यावेळी दोन सदस्यीय प्रभाग आहेत. प्रभागातील सरासरी लोकसंख्या ही २३२० आहे.
‘असे’ आहेत प्रभाग व तेथील आरक्षण
प्रभाग १ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण : कानडे वस्ती, सुमंत नगर, कुंभारवाडा, किल्ला वेस व मोहल्ला.
लोकसंख्या : २५१७
प्रभाग २ : ओबीसी व सर्वसाधारण महिला : हिरडे प्लॉट, सावन्त गल्ली, मार्केट यार्ड, मोहिद्दीन तालीम, वेताळ पेठ उत्तर बाजू, मेन रोड, पोथरे नाका व घोडेपीर मैदान.
लोकसंख्या : २१९१
प्रभाग ३ : ओबीसी व सर्वसाधारण महिला : मंगळवार पेठ, जुना बायपास रोड, गुजर गल्ली, चांदगुडे गल्ली, न. पा. दवाखाना परिसर, रावळ गल्ली, भवानी पेठ व दत्त पेठ उत्तर बाजू.
लोकसंख्या : २१९०
प्रभाग ४ : ओबीसी महिला व सर्वसाधारण : चांदगुडे गल्ली, कुंभार प्लॉट, कृष्णाजी नगर, गणेशनगर, फंड गल्ली व दत्त पेठ दक्षिण बाजू.
लोकसंख्या : २५११
प्रभाग ५ : ओबीसी महिला व सर्वसाधारण : फंड गल्ली, सुतार गल्ली, मेन रोड, कसाब गल्ली, कानाड गल्ली व पुणे रोड उत्तर बाजू.
लोकसंख्या : २२९५
प्रभाग ६ : अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण : वेताळ पेठ दक्षिण बाजू, मेन रोड, राशीन पेठ उत्तर बाजू, अण्णाभाऊ साठे नगर, खडकपुरा व कुंकू गल्ली.
लोकसंख्या : २२६३
प्रभाग ७ : अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण : राशीन पेठ दक्षिण बाजू, कानाड गल्ली पेट्रोलपंप परिसर, भीमनगर, खंदक रोड, महात्मा गांधी विद्यालय व किल्ला वेस.
लोकसंख्या : २४८३
प्रभाग ८ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण : किल्ला विभाग, रंभापूरा, माने प्लॉट, जाधव प्लॉट व सुमंतनगर पश्चिम बाजू झोपडपट्टी.
लोकसंख्या : २११९
प्रभाग ९ : ओबीसी महिला व सर्वसाधारण : पुणे रोड समोरील झोपडपट्टी, शॉपिंग सेंटर, पोलिसलाईन, तहसील कार्यालय, विद्यानगर, कॉटेज, शिवाजीनगर, घोलप नगर, महेंद्र नगर, देशभक्त नामदेवरावजी जगताप शॉपिंग सेंटर व एसटी स्टॅन्ड समोरील शॉपिंग सेंटर.
लोकसंख्या : २१२४
प्रभाग १० : अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला : सिद्धार्थ नगर, नगरपालिका कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद विश्रामगृह, बी ऍन्डसी विश्रामगृह, मौलालीमाळ, सात विहीर परिसर व मुथा प्लॉट.
लोकसंख्या : २५०६.
