करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात केले. यावेळी प्रा. डॉ. चारू देवकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य’ या विषयावर विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यासह यशवंत परिवारातील सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना भाग्यवंत यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
