वांगी नं. ३ येथील विविध विकास कामांसाठी 35 लाख निधी मंजुर

Eggplant 35 lakh funds sanctioned for Wangi development works here

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नं. ३ येथील विविध विकास कामांसाठी 35 लाख निधी मंजुर झाला आहे. २०२३- २४ आर्थिक वर्षातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मूलभूत सुविधा 2515 योजनेअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने सुधीर कांबळे घर ते सोमनाथ झुंबाड रस्ता काँक्रीट करणे यासाठी पाच लाख रुपये, सचिन लोंढे घर ते साहेबराव रोकडे घर रस्ता काँक्रीट करणे यासाठी पाच लाख रुपये, एसटी स्टँड ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे यासाठी पाच लाख रुपये व इतर कामासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला असून येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती वांगी नं. 3 ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर रोकडे यांनी दिली. 35 लाख निधी मंजूर केल्याबद्दल आमदार शिंदे यांचे वांगी नं. 3 ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *