करमाळा (सोलापूर) : येथील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात शाळा प्रवेश उत्साहात झाला. पाचवी ते आठवी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रंगरंगोटी, रांगोळी, कार्टून करून आनंदायी वातावरण निर्माण केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक महादेव फंड तर प्रमुख उपस्थितीत विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते बोलक्या भिंतींच्या 5 वीच्या वर्गाचे उदघाटन करण्यात आले.
पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना मिष्टान्नचे वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आले. शाळेचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय भस्मे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात शाळेची गुणवत्ता, शाळेने केलेल्या प्रगतीची माहिती दिली. उपस्थितांचे आभार अर्जुन जगदाळे यांनी मानले.