पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने विधानसभा निवडणूकीचे तिकीट वाटप प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले होते. तरीही कोथरूड मतदार संघातील बाळासाहेब खंकाळ महायुतीच्या प्रचारात उपस्थित होते. त्यामुळे पक्ष विरोधी काम करत असल्याने त्यांच्यावर पक्षाच्या वतीने सर्वानुमते हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सोनवणे यांनी म्हटले की, बाळासाहेब खंकाळ यांना पक्षाच्या कुठल्याही पदाचा वापर करण्यात येणार नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, वडगावशेरी विधानसभा अध्यक्षपदी पक्षाच्या वतीने अधिकृतपने विनोद टोपे हे अध्यक्ष असतील तसेच कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भारत भोसले असतील. शहराध्यक्षाच्या सहमतीने व सहयाने शहरातले इतर सर्व पदाची नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.