सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्याचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पोर्टल वरती अर्ज भरण्यासाठी 16 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षात सोलापूर शहरातील व सोलापूर महापालिका हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील पात्र नवीन व नुतनीकरण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहनही समाजकल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.