करमाळा (सोलापूर) : पालकत्व फाउंडेशन राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समितीच्या वतीने पुणे येथील बालगंधर्व मंदिरात रविवारी (ता. 11) सकाळी 11 वाजता ‘राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार’ वितरण सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मातोश्री सरिता फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्य सैनिक नरसिंह चिवटे यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ लेखक राजन खान, खासदार मेधा कुलकर्णी, राजमाता जिजाऊ यांचे वंशज रणजीतसिंह जाधव, सह्याद्री कन्या डॉ. शितल मालुसरे उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी करमाळ्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आव्हान करमाळा पत्रकार संघाचे सचिव कबीर यांनी केले आहे.
