करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील नेरले येथील शेतकरी जयहरी सावंत यांनी पावसाअभावी जळुन चाललेल्या उडीद व तुरीवर रोटाव्हेटर फिरवीला आहे. मेमध्ये झालेल्या पावसावर जुनमध्ये त्यांनी पेरणी केली होती. परंतु नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे बियाणे उगवले नाही. परीणामी दुबार पेरणी करावी लागली. आगोदर मोलामहागाईचे बियाणे खते खरेदी करताना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांने दुबार पेरणीसाठी खर्च करावा लागला. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने आहे ते पीक जळून गेले आहे. पावसाअभावी खरीप पिके जळुन चालली आहेत ४ जुनपासुन आजपर्यंत कसलाही पाऊस न झाल्याने खरीप हंगाम पुर्ण वाया गेला आहे. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातुन बाहेर काढावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
नेरलेत शेतकऱ्यांने फिरवला उडीदावर रोटाव्हेटर
