सोलापूर : पुन्नरचित हवामान आधारित फळविक विमा योजना 2024- 25 अंतर्गत खरीप हंगामचा 1 जून 2024 पासुन फळपिक विमा भरण्यास सुरवात झाली आहे. डाळिंब, चिक्कु, संत्रा, पेरू, लिंबू व सिताफळसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळपिक विमा भरू शकतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळपिकाचे क्षेत्र असुन अधिकाअधिक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे.
फळपिक विमा योजनेत पेरू, 3500 विमा हप्ता, 70 हजार संरक्षित रक्कम, लिंबू 4 हजार विमा हप्ता, 80 हजार विमा संरक्षित रक्कम इतकी आहे. विमा संरक्षित कालावधी 15 जून 15 ऑगस्ट 2024 असून विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जूनपर्यंत. चिक्कु 3500 रुपये विमा हप्ता, विमा संरक्षित रक्कम 70 हजार रुपये विमा संरक्षित कालावधी 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024, संत्रा 5 हजार विमा हप्ता, विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2024 असून विमा संरक्षित कालावधी 15 जून ते 15 ऑगस्ट 2024, डाळिंब 8 हजार रुपये विमा हप्ता, 1 लाख 60 हजार विमा संरक्षित रक्कम, विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2024 असून विमा संरक्षित कालावधी 15 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2024 इतका आहे. सिताफळसाठी 3 हजार 500 रुपये विमा हप्ता, 70 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे. विमा संरक्षित कालावधी 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2024 इतका असणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
आपले पिक ज्या महसुल मंडळात आहे त्या महसूल मंडळासाठी सदर पिक अधिसुचित आहे किंवा नाही याबाबत खात्री करूनच आपल्या पिकाचा विमा भरावा, तरी जिल्ह्यतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 7/12, 8 अ, आधारकार्ड व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन जवळच्या सी.एस.सी केंद्रास विहित कालावधीत भेट द्यावी तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधुन पिकविमा हप्ता भरणेबाबत बॅक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपिक विमा भरावा व आपले पिक संरक्षित करून घ्यावे असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस.गावसाने यांनी केले आहे.