करमाळा (अशोक मुरुमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असला निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १७ मार्च) सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह बागल, सावंत, प्रा. झोळ गटाच्या कार्यकत्यांचे २१ संचालकांच्या निवडीसाठी तब्बल २७२ अर्ज दाखल केले आहेत. इच्छुकांनी ४०३ अर्ज खरेदी केले होते. मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दाखल अर्जात माजी आमदार जगताप व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांचे अर्ज आहेत. छानणीनंतर २ एप्रिलपर्यंत मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीसाठी ऊस उत्पादक गटात पाचपैकी तीन वर्ष ऊस गाळपाची अट होती. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली होती. मात्र सायंकाळी हा नियम शिथिल झाल्याचे मार्गदर्शक सूचनात समजले आहे. त्यामुळे अनेक अर्ज मंजूर होणार आहेत. आता फक्त मागे कोण घेणार हे पहावे लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसिंह भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे या काम पाहत आहेत.

निवडणुकीसाठी दाखल झालेले गटनिहाय अर्ज : सालसे ऊस उत्पादक गट : देवराव सरडे, नवनाथ जगदाळे, चिंतामणी जगताप, सुनील सावंत, संजय ठाकर, वसंत अंबारे, रविकिरण फुके, दत्तात्रय जगदाळे, भरत सरडे, नागनाथ किरवे, रामानंद सरडे, बाजीराव माने, भारत कवडे, दशरथ हजारे, शिवाजी ढवळे, अण्णासाहेब देवकर, कन्हैयालाल देवी, धनंजय पाटील, अशोक हनपुडे, शाहजी राजेभोसले, महादेव धांडे, महादेव जाधव, पांडुरंग हाके, अशोक घरबुडवे, गणेश सरडे, डॉ. वसंत पुंडे, प्रदीप दळवी, ज्योतीराम वळेकर, अंगद मोरे पाटील, विलास जगदाळे, काकासाहेब सरडे, शशिकांत पवार, दादासाहेब सरडे, महेश चिवटे, बळवंत राऊत, पोपट सरडे, लुणावत व अतुल मस्कर.

रावगाव ऊस उत्पादक गट : कल्याण पाटील, संदीप मारकड, रामचंद खराडे, सुभाष शिंदे, आमदार नारायण पाटील, सचिन काळे, नानासाहेब शिंदे, महादेव गायकवाड, विनय ननवरे, माजी आमदार जयवंतराव जगताप, नागनाथ लकडे, हरिभाऊ झिंजाडे, देवानंद बागल, सुनीता चिवटे, संजय जाधव, अनिल केकाण, जालिंदर लोकरे, महादेव पोरे, प्रा. शिवाजी बंडगर, तुकाराम कोळेकर, ऍड. राहुल सावंत, सुजित बागल, अजिनाथ शिरगिरे, हरिश्चंद्र झिंजाडे, आशिष गायकवाड, नवनाथ केकाण, सुभाष पवार, सचीन पांढरे, अभिजित पाटील, भारत लोकरे, सुहास काळे, दिवाण बागल, शंभूराजे जगताप, किसन शिंदे, संतोष पाटील, विठ्ठल शिंदे, दिगंबर नाझकर, अमित केकाण, दीपक केवारे, जयवंतराव वारे, डॉ. अमोल घाडगे, संतोष वारे, सुभाष जरांडे, सुदाम लेंडवे, गहिनीनाथ ननवरे व सुभाष शिंदे (पोथरे).

पोमलवाडी ऊस उत्पादक गट : उदयसिंह पाटील, किरण कवडे, दत्तात्रय गायकवाड, दादासाहेब कोकरे, प्रा. रामदास झोळ, सुहास गलांडे, महादेव नवले, देविदास साळुंके, भारत जगताप, नानासाहेब साखरे, राजेंद्र बाबर, संतोष पाटील, सुरेश साळुंके, निवृत्ती निकम, रणजित शिंदे, ऍड. नितीन राजेभोसले, बबन जाधव, दशरथ पाटील, भारत कोकरे, कैलास कोकरे, नवनाथ दुरंदे, सचिन पांढरे, रेवणनाथ साखरे, बापू मोरे, शालन गुंडगिरे, जालिंदर पानसरे, नितीन जगदाळे, विलास कोकणे, नवनाथ झोळ, प्रकाश गिरंजे व श्रीनिवास पाटील.

केम ऊस उत्पादक गट : रामदास शिंदे, रंगनाथ शिंदे, शंकर जाधव, महावीर तळेकर, अच्युत तळेकर, महेंद्र पाटील, दत्तात्रय देशमुख, सोमनाथ रोकडे, हरिदास डुबल, नवनाथ शिंदे, तात्याबा सरडे, बापूराव तळेकर, आमदार नारायण पाटील, धनंजय गायकवाड, संजय गुटाळ, शिवराज रोकडे, काकासाहेब निंबाळकर, शाहजी देशमुख, अमोल भांगे, दादासाहेब पाटील, सुहास रोकडे, सुधीर साळुंखे, पांडुरंग जाधव, माजी आमदार संजयमामा शिंदे, दिलीप दोंड, हरिभाऊ गरड, भास्कर भांगे, अजिनाथ फरतडे, मकसूद जहागीर, संग्राम पाटील, विजय नवले, नितीन तकिक, विठ्ठल केकाण, बापूराव देशमुख, दीपक देशमुख, रामेश्वर तळेकर, रविराज देशमुख, महादेव डुबल, सोमनाथ देशमुख, तुकाराम पाटील, सोमनाथ पोटे, तानाजी देशमुख व भीमराव तकीक.

जेऊर ऊस उत्पादक गट : धुळा कोकरे, संदीप मारकड, प्रवीण भोसले, भूषण बारकुंड, प्रशांत पाटील, प्रमोद बदे, करू गव्हाणे, दत्तात्रय सरडे, लक्षण गोडगे, अतुल गोडगे, धनंजय डोंगरे, महादेव पोरे, गोरख लबडे, सुभेदार पाटील, श्रीमान चौधरी, राहुल लबडे, चंद्रहास निमगिरे, महादेव घाडगे, राजाराम सरडे, जालिंदर कोकरे, रामराव गव्हाणे, चंद्रकांत सरडे, संभाजी पोळ, मारुती पवार, बिभाषण पवार, सिंधू ढेरे, प्रताप पोळ, दत्तात्रय कामटे, जगदीश निंबाळकर, दत्तात्रय गव्हाणे, राजेंद्र पोळ, सतीश निंबाळकर, सुहास साळुंखे, महादेव कामटे, शांतीलाल जाधव, पंडित गव्हाणे व संजय तोरमल.

इतर मागास वर्ग मतदारसंघ : राजाराम जाधव, दशरथ हजारे, देवानंद बागल, प्रा. रामदास झोळ, दादासाहेब पाटील, सुनील सावंत, ऍड. राहुल सावंत, चंद्रहास निमगिरे, चंद्रकांत सरडे, प्रदीप दळवी, नवनाथ जगदाळे, महेश चिवटे, रोहिदास माळी, रंगनाथ शिंदे, पोपट सातव, शिवाजी राखुंडे, दत्तात्रय देशमुख, गणेश सरडे, संतोष वारे व अतुल मस्कर.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मतदारसंघ : रमेश कांबळे, पांडुरंग वाघमारे, दशरथ कांबळे, बाळकृष्ण सोनवणे, शिवमूर्ती ओहोळ, राजेंद्र कदम, राजेंद्र कांबळे, प्रकाश लोंढे व ओदूंबर मोरे.

सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गट : डॉ. हरिदास केवारे, दशरथ कांबळे, शारदा मोरे, सुजित बागल व विशाल केवारे. (महिला राखीवची नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत.)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *