सुनेनंतर आठच दिवसात हृदयविकाराच्या तीव्र धक्याने सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू! बिटरगाववर शोककळा

करमाळा (सोलापूर) : शेतात काम करताना जखमी होऊन सुनेच्या अपघाती मृत्यूनंतर आठच दिवसाच्या आत सासऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे. या घटनेने बिटरगाव श्री गावावर शोककळा पसरली आहे. मनीषा नितीन मुरूमकर (वय ३४) यांचा बुधवारी (ता. ७) नगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. त्यातून सावरत असतानाच लालासाहेब विनायक मुरूमकर (वय ६१) यांचे आज (ता. १४) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास निधन झाले.

सून मनीषा मुरूमकर यांचा शेतात बोअरवेलमधील मोटार काढत असताना दावे तुटून लाकूड डोक्याला लागून उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या मृत्यूची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या मागे पती, तीन मुले, सासू व सासरे होते. त्यांचा येत्या शुक्रवारी (ता. १६) दशक्रियाविधी होणार होता. त्या दुःखात असतानाच सासरे लालासाहेब मुरूमकर यांचे राहत्या घरीच हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या मागे एक भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे. ते बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते. सेवानिवृत्त आदर्श शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचे ते चुलत बंधू होते. माजी आमदार स्व. नामदेवराव जगताप यांचे विश्वासू सहकारी कै. भगवानराव शिंदे यांचे अत्यंत विश्वासून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *