करमाळा (सोलापूर) : किंडरजॉय सीएससी बालविद्यालयातील विद्यार्थ्यांची श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालयास क्षेत्रभेट झाली. या उपक्रमामध्ये किंडरजॉय विद्यालयातील मुलांनी शाळेतील मूकबधिर मुलांशी संवाद साधला. येथील विद्यार्थी स्पेशल असून देखील त्यांच्यामधील गुणवत्ता आणि चिकाटी ही त्यांच्या व्यक्तीमत्वमधील असामान्यबाब आहे. हे त्यांच्यासोबत विशिष्ट पद्धतीने संवाद साधतांना लक्षात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उपजत काही विशिष्ट कौशल्ये असतात त्यांची भावनिक आणि शारीरिक वाढ अतिशय सामान्य असते. कधी कधी हि मुले सामान्य मुलांपेक्षाही सरस ठरत असल्याचे दिसून आले. किंडरजॉय सीएससी बालविद्यालयच्या प्राचार्या राजश्री कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रभेट झाली. भेटीदरम्यान मूकबधिर मुलांसोबत वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांना आनंद देण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी डान्स करून मनसोक्त आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सहभोजन करून आपल्या मैत्रीचा अस्वाद घेतला. या भेटीला यशस्वी करण्यासाठी किंडरजॉय सीएससी बालविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.