जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; करमाळ्यात भाजपचे निवेदन

File a case of sedition against Jitendra Awad BJP statement in Karmala

करमाळा (सोलापूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून महामानवाचा अवमान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

महाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आव्हाड यांनी जाणीवपूर्वक फाडले आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, संजय घोरपडे, सोमनाथ घाडगे, दादासाहेब देवकर, सचिन चव्हाण, वैभव आहेर, लखन शिंदे, भैय्या गोसावी, प्रवीण शेळके, सचिन कानगुडे, चंद्रकांत शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, विठ्ठलभाऊ शिंदे, विष्णू रणदिवे, कमलेश दळवी, पूजा माने, जयंत काळे पाटील, रविकिरण माळवे, कपिल मंडलिक, संजय जमदाडे, प्रकाश ननवरे , नाना अनारसे, प्रसाद गेंड, गणेश गोसावी, शरद कोकीळ, विवेक अवसरे, नितीन निकम, गणेश महाडिक, गणेश माने, चांगदेव जानकर, अशोक सातपुते, भरत गुंड, हनुमंत बरडे, विनोद इंदलकर, संतोष जवकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *