Final voter list published on the occasion of assembly election in Solapur district

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज (शुक्रवारी) अंतिम मतदार यादी प्रसिध्दी झाली आहे. या यादीत 37 लाख 63 हजार 789 मतदार आहेत. 6 ते 30 ऑगस्ट या दरम्यान 75 हजार 824 मतदारांची वाढ झाली आहे. अंतिम मदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केले आहे.

प्रारूप मतदार यादीमध्ये 36 लाख 92 हजार 409 मतदार होते. त्यात 19 लाख 8 हजार 146 पुरुष, 17 लाख 83 हजार 966 महिला व 297 इतर मतदारांचा समावेश होता. अंतिम मतदार यादीमध्ये 37 लाख 63 हजार 789 मतदार असून यामध्ये 19 लाख 35 हजार 979 पुरूष, 18 लाख 27 हजार 508 महिला व इतर 302 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघात 3723 मतदान केंद्र असून एकूण 37 लाख 63 हजार 789 मतदार संख्या आहे.

लोकसभा निवणुकीत 3 हजार 617 मतदार केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या 3 हजार 723 झाली आहे. शहरी भागात 1 हजार 177 व ग्रामीण भागामध्ये 2 हजार 546 मतदान केंद्राचा समावेश आहे. नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करावी. ज्या नागरिकांची अजूनही मतदार यादीमध्ये नावे नसतील त्यांनी निरंतर प्रक्रीयेमध्ये नाव नोंदणी करू शकतात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेल्या अथवा काही दुरूस्ती असलेस संबधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कळविले आहे.

विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्र…
करमाळा : 3 लाख 24 हजार 35, पुरुष 1 लाख 69 हजार 390, महिला 1 लाख 54 हजार 633 व 12 इतर. (4737 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 347
माढा : 3 लाख 44 हजार 547, पुरुष १ लाख 80 हजार 547, महिला १ लाख 63 हजार 997 व ३ इतर. (5 हजार 339 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 355
बार्शी : 3 लाख 27 हजार 657, पुरुष १ लाख 69 हजार 100, महिला १ लाख 58 हजार 516 व 41 इतर. (4719 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 333
मोहोळ (अ.जा) : 3 लाख 25 हजार 999, पुरुष १ लाख 70 हजार 840, महिला १ लाख 55 हजार 151 व इतर ८ (4762 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 336
सोलापूर शहर उत्तर : 3 लाख 22 हजार 668, पुरुष 1 लाख 60 हजार 198, महिला १ लाख 62 हजार 425 व इतर 45. (8199 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 289
सोलापूर शहर मध्य : 3 लाख 39 हजार 608, पुरुष १ लाख 67 हजार 662, महिला १ लाख 71 हजार 894 व इतर 52 तर (9947 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 304
अक्कलकोट : 3 लाख 74 हजार 536, पुरुष १ लाख 92 हजार 819, महिला १ लाख 81 हजार 676 व इतर 41. (10171 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 390
सोलापूर दक्षिण : 3 लाख 72 हजार 553, पुरुष १ लाख 91 हजार 610, महिला १ लाख 80 हजार 905 व इतर 38 ( 10566 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 362
पंढरपूर : 3 लाख 65 हजार 725, पुरुष १ लाख 87 हजार 889, महिला १ लाख 77 हजार 810 व इतर 26 (5874 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 357
सांगोला : 3 लाख 22 हजार 240, पुरुष १ लाख 67 हजार 777, महिला १ लाख 54 हजार 458 व इतर 5 (6619 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 305
माळशीरस (अ.जा) : 3 लाख 44 हजार 221, पुरुष १ लाख 78 हजार 147, महिला १ लाख 66 हजार 43 व इतर 31 (4891 मतदारांची वाढ). मतदान केंद्र : 345.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *