करमाळा (सोलापूर) : जेऊर पोस्ट कार्यालयात आज (गुरुवारी) दुपारी आग लागली आहे. ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगीत कागपत्रे जळू नयेत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. करमाळा नगरपालिकेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली असल्याची माहिती समजत आहे. आगीचे कारण मात्र अजून समजू शकलेले नाही. महावीर जयंती असल्याने कार्यलायाला सुट्टी होती. कार्यालयाच्या छतावरुन धुराचे लोट बाहेर पडल्याने आग लक्षात आली हे लोट लांबपासून दिसत होते. स्थानिक नागरिकही मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
जेऊर पोस्ट कार्यालयात आग
