सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात 125 इच्छुकांनी 211 अर्ज घेतले आहेत. तर आजपर्यंत पाच व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज (मंगळवारी) शिवाजी सोनवणे यांनी अपक्ष तर वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. याबरोबर 16 व्यक्तींनी 36 अर्ज घेऊन गेलेले आहेत. आजपर्यंत 54 व्यक्तींनी 94 अर्ज घेतले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही आज दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये श्रीरामचंद्र घुटूकडे व रमेश बारस्कर यांचे अर्ज आहेत. या मतदारसंघात आज 32 व्यक्तींनी 53 अर्ज घेतले असून आतापर्यंत 71 व्यक्तींनी 117 अर्ज खरेदी केले आहेत.
