Aashadi wari : गोपाळ कृष्ण गोखले चौकात वारकऱ्यांना अन्नदान

पुणे : प्रभात तरुण मित्र मंडळ, करण ग्रुप, डेक्कन जिमखाना नागरिक समितीच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौक, कॅफे गुडलक शेजारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना राजगिरा लाडू, बिस्किटे, भेळ, पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले. ग्रुपमधील महिलांनी फेर धरून ‘विठू माऊली नामाचा’ गजर केला. तसेच फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. भक्तिमय आणि उत्साहवर्धक वातावरणात परिसरातील एकत्र येऊन वारीचा उत्सव साजरे केला. अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम, किमया ढेकणे, रंजना नाईक, सुवर्णा ऋषी, प्रिया रानडे, वृंदा गराम, भक्ती साठे, वृंदा बाम, प्राजक्ता जोगळेकर, समर ठाकर, योगेश जोगळेकर, करण तावरे, कल्याण तावरे, विराज तावरे तसेच कमला नेहरू परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *