करमाळा : पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वनविभाग करमाळा व ग्राम परिस्थितीकीय समितीच्या वतीने संगणक व जिमचे साहित्य देण्यात आले. वन विभागाच्या अधिकारी वनक्षेत्रपाल माळढोक पक्षी अभयारण्यच्या आर. एच. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेसाठी एक लॅपटॉप व सुसज्ज जिम असे साधारण चार लाखाचे साहित्य देण्यात आले.
वनविभागाच्या अधिकारी सातपुते, ग्राम परिस्थितीकीय समिती पिंपळवाडीचे अध्यक्ष मदन पाटील, करमाळा बीट 1 चे विस्ताराधिकारी मिनीनाथ टकले, ग्रामपंचायत पिंपळवाडीचे उपसरपंच वैशाली चव्हाण व ग्रामसेविका माने यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले. सातपुते मॅडम यांच्या हस्ते शाळेसाठी एक लॅपटॉप सुपूर्द करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद कांबळे यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले. विषय शिक्षक श्रीमंत निंबाळकर व उपशिक्षक सदाशिव वनवे यावेळी उपस्थित होते.