करमाळा (सोलापूर) : रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त माजी मंत्री महादेव जनकर यांनी करमाळा तालुक्यात गावभेट दौरा केला आहे. सोमवारी (ता. १०) त्यांनी हा दौरा केला. या दौऱ्यानिमित्त रासपच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्यात वरकुटे येथे त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अळसुंदे, सालसे, फिसरे, पांडे येथे त्यांनी भेट दिली.
श्री देवीचामाळ येथे मंत्री जानकर यांनी धायखिंडी, खांबेवाडी येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पुढे करमाळा शहरातील भवानीनाका, एसटी स्टॅन्ड, दत्तमंदिर, कोर्ट रोड व सिद्धार्थनगर येथे जानकर यांनी भेटी दिल्या आहेत. त्यानंतर देवळाली, जेऊर, शेलगाव फाटा, पांगरे व कंदर येथेही त्यांनी भेटी दिल्या आहेत.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते, तालुकाध्यक्ष जीवन होगले, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, विठ्ठल भिसे, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष जहांगीर पठाण, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा सुतार, जगनाथ सलगर, शंकर सूळ, सुहास ओहळ, बाळासाहबे टाकले, संतोष पाटील, नारायण शिंदे, बापू कोकरे, अमोल सुकळे, तानसिंग खांडेकर आदी उपस्थित होते.