करमाळा पंचायत समितीत झळकला माजी आमदार शिंदे यांचा फोटो

Former MLA Sanjaymama Shinde Photograph Displayed at Karmala Panchayat Samiti

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पहिल्यांदाच फोटो झळकला आहे. राष्ट्रवादीचे नेते स्व. अजितदादा पवार, माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांचाही फोटो पंचायत समितीत लागलेला आहे. त्यांच्याबरोबर माजी आमदार शिंदे यांचाही फोटो झळकला आहे.

करमाळा पंचायत समितीची निवडणूक स्थानिक पातळीवर बागल व शिंदे हे एकत्रित लढले होते. शिंदे हे राष्ट्रवादीचे तर बागल हे भाजपचे आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा करमाळ्यात गटाचे राजकारण जास्त चालते. निवडणुकीचा निकाल होताच बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत हिवरवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब पवार यांच्या हस्ते दिगंबरराव बागल यांचा पंचायत समीतीच्या सभापती यांच्या कक्षात फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर सभापती व उपसभापती यांची निवड झाल्यानंतर पवार व शिंदे यांचाही फोटो येथे झळकला आहे. करमाळा पंचायत समितीत सभापती पूजा ढेरे या बागल समर्थक आहेत. तर उपसभापती ऍड. विघ्ने हे शिंदे समर्थक आहेत. या ठिकाणी आणखी काही फोटो झळकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *