करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून चार अपक्षांची माघार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून चार अपक्ष उमेदवारांनी आज (बुधवार) माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक १ ब मधून अमन नालबंद, प्रभाग क्रमांक १० ब मधून विजया जानराव, प्रभाग क्रमांक ३ मधून गोपाळ वाघमारे व प्रभाग क्रमांक १ मधून समर शेख या चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

करमाळा नगरपालिकेच्या १० प्रभागातून एक नगराध्यक्ष व २० नगरसेवकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीत १५० उमेदवारांचे २०३ अर्ज मंजूर झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन तपसे हे काम पाहत आहेत. निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *