Free eye checkup camp at Karmala through Shrenik Khater

करमाळा (सोलापूर) : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळच्या वतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी रुग्णालयाचे डॉ. गिरीश पाटील व परमेश्वर बोडगे यांनी तपासणी केली. कार्यक्रमासाठी अनिल सोळंकी, बाळासाहेब महाजन, रोहित वाघमारे , भाजपचे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, गोसेवा समितीचे सदस्य जगदीश शिगाजी, नितीन दोशी, दिनेश मुथा, वैभव दोशी, आशिष बोरा यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.

खाटेर यांनी मागे सुमारे 4700 च्या पुढे रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन केले. आजच्या शिबिरात 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 27 रुग्ण ऑपरेशनसाठी पुणे येथे दाखल केले आहेत. महिन्याच्या 27 तारखेला दत्त मंदिर, दत्त पेठ येथे हे शिबीर होणार आहे, असे सांगितले.

शिबिरासाठी गुलाम गोस, संतोष भांड, दत्त मंदिरचे पुजारी श्री. कुलकर्णी, चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, गिरीश शहा, शशि ननवरे, आदित्य कुळकर्णी, सतीश शिंदे यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संकेत खाटेर यांनी केले. वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *