करमाळा शिक्षक भारतीच्या प्रसिद्धी प्रमुखपदी गायकवाड

Gaikwad as Publicity Head of Karmala teacher Bharti

करमाळा (सोलापूर) : कंदर येथील कन्वमुनी विद्यालयातील सहशिक्षक बाळकृष्ण गायकवाड यांची शिक्षक भारती संघटनेच्या करमाळा तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिक्षक भारती संघटना जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षण विभाग, वेतन पथक या ठिकाणी प्रलंबित असणाऱ्या अनेक कामासाठी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. परंतु शिक्षक भारतीच्या माध्यमातून प्रशासन पातळीवरील कामे होऊ लागली आहेत.

गायकवाड यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष काटमोरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज अत्तार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आतनूर, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष देवदत्त मेटकरी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मायाप्पा हाके, जिल्हा संघटक शरद पवार, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष प्रा. शाहूराव बाबर, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार देवकाते, करमाळा तालुकाध्यक्ष विजयकुमार गुंड, अक्कलकोट तालुकाध्यक्ष हिरेमठ, किशोर पोतदार, तिपन्ना कोळी, सचिन शिंदे, प्रवीण जाधव, मानेकरी प्रशालेचे सुरवसे सर, एस व्ही सी एस प्रशालेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका उपाध्यक्ष किशोर जाधवर, तालुका सचिव सचिन गाडेकर, तालुका कोषाध्यक्ष गोरख ढेरे, तालुका संघटक सागर देशमुख यांनी यावेळी गायकवाड यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *