करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवारी दिग्विजय बागल यांना मिळाली आहे. भाजपमधून ऐनवेळी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती ‘धनुष्यबाण’ दिले. त्यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात ‘शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालय’ही सुरु झाले आहे. मात्र अजून तरी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे या प्रक्रियेत कोठेही दिसत नाहीत. त्यावरून चिवटे हे बागलांवर नाराज आहेत का? ते निवडणुकीत त्यांचे काम करतील का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात केले जाऊ लागले आहेत.
माजी आमदार जगतापांची शनिवारी करमाळ्यात तोफ धडाडणार
गणेश चिवटे यांनी तालुक्यात भाजप वाढवण्यासाठी काम केले आहे. तालुक्यात प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. त्यामाध्यमातून त्यांनी गावागावात विकास कामांसाठी निधी आणला आहे. दूध व्यवसायातून त्यांनी कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांनी विकास कामांना निधीही उपलब्ध केला होता. भाजपशी एकनिष्ठ राहून त्यांनी तालुक्यात काम केले आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.
कुकडी उजनी योजनेच्या माध्यमातून कामोणेसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवणार
करमाळ्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेली राष्ट्रवादीची (अजित पवार गट) उमेदवारी आमदार संजयमामा शिंदे यांनी घेऊ नये त्यांनी अपक्षच निवडणुकीत उतरावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर येथील जागा भाजपला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान चिवटे यांनी ही जागा भाजपमधील निष्ठांवंत कार्यकर्त्याला देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावले होते. दरम्यान पक्षश्रेष्ठीनी त्यांची समजूत काढली.
बागलांचे खच्चीकरण करण्यासाठी मकाई व आदिनाथचे बळी; रश्मी बागल यांच्याकडून टीकास्त्र
चिवटे यांनी आपण पक्ष आदेश पाळून काम करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता स्थानिक पातळीवर बागल व चिवटे यांच्यात काही मतभेद आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. बागल यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा चिवटे यांना निमंत्रण नव्हते? त्यानंतर चिवटे व बागल यांचे करमाळ्यात स्वतंत्र दौरे झाले. तेव्हाही त्यांच्यात नाराजी आहे का? असे प्रश्न केले जात होते. आता प्रचार सुरु झाला असून गणेश चिवटे आणि बागल अजून अधिकृतपणे कार्यक्रमात एकत्र आले असल्याचे दिसत नाही. त्यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत