करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. पुन्हा आमदार झाल्यानंतर स्थिर सरकार मिळाले की दोन वर्षात राहिलेले प्रश्न मार्गी लावली जातील. गणेश चिवटे यांना विकासाची दृष्टी असून आपणही विकासाच्या माध्यमातूम इथपर्यंत आलो आहोत त्यामुळे आता आमच्या या डबल इंजिनमुळे तालुक्यातील विकासकामे गतीने होणार आहेत, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात भाजपने शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल व त्यांच्या समर्थकांनी आज (मंगळवारी) शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवार आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा दिला आहे. गायकवाड चौक येथून पदयात्रा काढत विकी मंगल कार्यालय येथे सभेने हा पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निघालेल्या या पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.

करमाळा शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी केले आहे.

गणेश चिवटे म्हणाले, ‘१५- २० वर्षात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नागरिकांची सेवा केली. करमाळा शहर व तालुक्यातील विकासाची चक्र पाहिजेत तेवढ्या प्रमाणात फिरत नव्हती. तालुका शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, रोजगार, उद्योग व्यावसाय या बाबतीत मागे आहे. येत्या काळात जाणीवपूर्वक तालुक्यातील सर्व घटक स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण आमदार शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

यावेळी चंद्रकांत सरडे, विलास पाटील, लतीफभाई तांबोळी, अमोल काळदाते महाराज, नितीन झिंजाडे, अजिनाथ सुरवसे, बंडू शिंदे, जगदीश अगरवाल, विलासराव पाटील, भगवान गीरी, लतीफ तांबोळी, चंद्रकांत सरडे, मासाळ आदींनि मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अमोल पवार यांनी केले. तर आभार उमेश मगर यांनी केले. मंचावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी, अफसर जाधव, रामा ढाणे, मोहन शिंदे, तात्या मस्कर, विवेक येवले, गौरव झाझुर्णे, संजय घोलप, काकासाहेब सरडे, ऍड. नितिनराजे राजेभोसले, सरपंच किरण फुंदे, भोजराज सुरवसे, आशिष गायकवाड, डॉ. अभिजित मुरूमकर, नितीन निकम, सोमनाथ घाडगे, किरण शिंदे, जयंत काळे पाटील, धनु किरवे, धर्मा नाळे, दादा देवकर, उदय ढेरे, लक्ष्मण शेंडगे, सतीश फंड, अभिषेक आव्हाड, गणेश वाळुंजकर, संगीता नष्टे, राजश्री खाडे, चंपावती कांबळे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *