करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांच्यावर पक्ष श्रेष्टींकडून कारवाई झाली होती. मात्र त्यांची जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची फेर निवड केली आहे.
भाजपाचे प्रदेशाशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने या फेरनिवडी झाल्या आहेत. कारवाई झालेल्या करमाळ्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश आले आहेत. निवडणुकीत पक्षविरोधी कारवाईबद्दल पक्षाने त्यांना निष्कासित केले होते. आता ही कारवाई भाजपाचे प्रदेशाशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्थगित करून सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस चिवटे म्हणाले, आम्ही भाजपाचे काम निष्ठेने केले आहे. पुढील काळातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. राज्यात व केंद्रात भाजपा महायुतीचे सरकार आहे.