करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांनी भाजपकडून आज (रविवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व करमाळा शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याची प्रतिक्रिया घुमरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली आहे.
घुमरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी माजी आमदार शामलताई बागल, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल कोलते, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, माजी नगरसेवक अतुल फंड, युवा नेते विजय लावंड, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, माजी नगरसेवक सचिन घोलप, मकाईचे संचालक अमोल यादव आदी उपस्थित होते. भाजपच्या वतीने नगरपालिकेसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
