करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पहिल्यांदाच रविवारी (ता. १४) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सकाळी ९: ३० वाजता क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ही मिरवणूक निघणार आहे. बॅंन्जो व हालगीच्या तालावर ही मिरवणूक निघणार आहे. गायकवाड चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे जय महाराष्ट्र चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक भवानीनाका, देवीचा- रोड येथून अथर्व मंगल कार्यालय येथे राजे उमाजी नाईक यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारोप होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळ्यात उद्या आद्य क्रांतिवीर राजेउमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
