करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उमरड येथे आज (गुरुवारी) ‘दारु व जुगार बंदी’ या विषयावर पोलिस निरीक्षक विनोद घुगे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीतजास्त नागरिक व बचत गटाच्या महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे. महादेव मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता हे मार्गदर्शन होणार आहे.

