करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथील यश मंगल कार्यालयात ‘कृषी दिनानिमित्त’ कार्यक्रम झाला. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. राहुरी कृषी विद्यापीठ संलग्न सद्गुरू कृषी महाविद्यालय येथील अभ्यासासाठी आलेले विद्यार्थी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. श्री. छत्रपती संभाजी विद्यालयातील सारथी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी श्रद्धा वाघमारे, मधुरा वळेकर, शिवराज कन्हेरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी कृषी विषयी योजना सांगत लाभ घेण्याचे आव्हान केले. जेऊर मंडळाच्या कृषि पर्यवेक्षक रोहिणी सरडे यांनी PMFME योजने विषयी माहिती दिली.गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती दिली. अंगणवाडी सेविका, बचत गट, आशा सेविका यांना योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले.

निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले. या योजनेतील त्रुटी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. काही अडचणी असल्यास तातडीने संपर्क साधा. आम्ही सर्वोतोपरी मदत करू असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी गणेश सलगर, राणी लक्ष्मी महिला ग्रामसंघ व जिजाऊ महिला ग्रामसंघ, ग्रामपंचायत कर्मचारी, दिलीप मुळे, रविंद्र राऊत, संतोष पाटील, महेश वाघमारे, पप्पू मस्के, जलाल पठाण, बाबुराव भंडारे यांनी परिश्रम घेतले.

पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, उपसरपंच अनिता पाटील, मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी पर्यवेक्षक प्रताप तळेकर, बि. के. बेरे, आकाश पवार, हनुमंत पवार, CRP सुषमा वाघमारे, मंजुश्री मुळे, शीतल दळवे, दीपक गवळी, प्रवीण वळेकर, दत्ता वळेकर, समाधान गाडे, समाधान वळेकर, लक्ष्मण वळेकर, राज पठाण, मुन्ना पठाण आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *