कन्या विद्यालयात ‘पोस्को’, ‘समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनीयते’वर मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या वतीने येथील श्री कमलादेवी कन्या विद्यालयात नुकतेच कायदेविषयक शिबिर झाले. यामध्ये ‘पोस्को कायदा’, ‘समाजातील महिलांची सुरक्षितता आणि गोपनीयता’ व ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज एस. शर्मा, सचिव एम. पी. शिंदे, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) संजय घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर झाले.

करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. नीळ, उपाध्यक्ष ए. एच. पठाण, श्रीमती ऍड. आर. आर. शिंदे, ऍड. एम. बी. चांदणे, ऍड. इंगळे, ऍड. पिंपरे, सह पोलिस निरीक्षक गिरीजा मस्के, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता शेलार उपस्थित होते. ऍड. पठाण यांनी प्रास्ताविक केले. ‘पोस्को कायदा’ यावर ऍड. शिंदे यांनी, ‘समाजातील महिलांची सुरक्षितता आणि गोपनीयता’ या विषयावर मस्के व ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ या विषयावर मार्गदर्शन केले. घुगे यांनी विद्यार्थिनींना धाडसाने व आत्मविश्वासाने अभ्यासपूर्वक प्रयत्न करून यश संपादन करण्याचे आवाहन केले. याबरोबर जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे महत्त्व सांगितले. सहशिक्षक भीष्माचार्य चांदणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *