करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत श्रीदेवीचामाळ येथील श्री कमलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुकुल माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातील 90 ते 100 टक्के दरम्यान गुण मिळवलेले 8 विद्यार्थी आहेत. 80 ते 90 टक्के दरम्यान गुण मिळवलेले 9 विध्यार्थी आहेत. या विद्यालयातील सृष्टी फंड या विद्यार्थीनिने करमाळा तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. तिला 96.60 टक्के गुण मिळाले आहेत. सायली वडणे 93.20, स्वराली पाटील 91.80, देवेंद्र जाधव 91.40, श्रेया नलवडे 91, अलसिफा सय्यद 90.80, साक्षी लगस 90.40 व आकाश फुके या विद्यार्थ्याला 90.20 टक्के गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन भगत मॅडम, बनसुडे मॅडम, सपकाळ मॅडम, सातव सर, घोगरे सर, शिंदे सर, जगताप सर, वाघमारे सर यांच्यासह प्रशालेचे संस्थापक नितीन भोगे, सचिवा भोगे मॅडम यांनी केले.
