करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर (केटीएमपी) लेडीज ग्रुपच्या वतीने एकत्र येऊन ‘हळदी- कुंकू’चा कार्यक्रम झाला. त्यानिमित्त महिलांचे आरोग्य याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते.
करमाळा उपजिल्हा रुग्णालयासमोरील श्री दत्त मंदिर येथे नुकताच हा कार्यक्रम झाला होता. यावेळी डॉ. सुनीता दोशी, डॉ. सुजाता मेहता, डॉ. वैष्णवी पाटील, डॉ. विनया गायकवाड, डॉ. वैशाली घोलप, डॉ. मांजरी नेटके, डॉ. निशा सारंगकर, डॉ. उर्मिला जाधव, डॉ. अपर्णा भोसले, योगिता पवार, छाया परदेशी, सारिका लोकरे, संध्या शिंदे, डॉ. प्रीती शेटे, डॉ. मेघना निंबाळकर, डॉ. शिवानी पाटील, डॉ. आरती शिंदे, डॉ. नेहा मेहर व डॉ. कविता कांबळे आदी उपस्थित होत्या. वैद्यकीय सेवा करत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष असावे, महिलांनी स्वतःचे आरोग्याची काळजी घ्यावी व आपली संस्कृती जपावी असा संदेश यावेळी देण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत डॉक्टर महिला उपस्थित होत्या.
