करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेतातील झाड का तोडले?’ असे विचारले म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद शब्द वापरल्याचा प्रकार दहिगाव येथे घडला आहे. यामध्ये दारासिंग मुरलीधर शिंदे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून एकावर अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम व दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियमनुसार गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश भीमराव पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शेतातील मोटार बंद करण्यासाठी गेलो तेव्हा बांधावर गुन्हा दाखल झालेला संशयित पाटील हा आंब्याचे झाड तोडत असताना दिसला. तेव्हा झाड का तोडतो विचारले तेव्हा त्याने जातीवाचक शिवीगाळ करत सही करायला तुला दुसरा हातही ठेवणार नाही’, असे म्हणून अपमानास्पद शब्द वापरले.’
