करमाळा (सोलापूर) : शेलगाव (वां) येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक मित्र मंडळच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर झाले. याचा लाभ 760 नागरिकांनी घेतला. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, ईसीजी व औषधे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. संदीप पाटील, डॉ. राहुल बनसोडे, डॉ. धनंजय वावरे, रविराज कुंभार, डॉ. सारंग बोरकुटे, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. महेश देवकते, डॉ. गणेश वैद्य, डॉ. सचिन करळे, डॉ. वैशाली लोकरे, डॉ. पांडुरंग लोकरे, डॉ. शिंदे, डॉ. टोपे यांनी मोफत सेवा दिली. शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार दादासाहेब गायकवाड, हरिदास डांगे, अमर ठोंबरे, महादेव पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वैभव पाटील, भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे, जिल्हा सरचिटणीस नागनाथ केकान, गणेश केकान, रमेश चव्हाण, बाळू पोटे, संतोष केकान आदींनी परिश्रम घेतले.
शेलगावमध्ये कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर
