करमाळ्यात आज महिलांसाठी ‘होम मिनीस्टर- खेळ पैठणीचा’

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे मकर संक्रांतीनिमित्त शिव संकल्प फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंग जगताप यांच्या वतीने ‘होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी वारे यांनी केले आहे.

आज (शनिवारी) सायंकाळी साडेसहा वाजता कमलादेवी रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपा समोरील प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमात वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. यावेळी अनेक बक्षीसेही दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जगताप यांनी करमाळा तालुक्यात अनेक कार्यक्रम घेतले आहेत. क्रिकेट स्पर्धेनंतर महिलांसाठी हा अनोखा आणि मोठा कार्यक्रम होत आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *