करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखाऱ्यांच्या निवडणुकीसाठी बागल गटाकडून पोथरे येथे ‘होम टू होम’ प्रचार करण्यात आला आहे. बुधवारी (१४) तारखेला हा प्रचार करण्यात आला. यावेळी मांगी ऊस उत्पादक गटातील उमेदवार दिनेश भांडवलकर व अमोल यादव उपस्थित होते. बिनविरोध झालेले नवनाथ बागल, पोथरे येथील शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्यचंद्र झिंजाडे, माजी सरपंच सोपान शिंदे, सरपंच धनंजय झिंजाडे, प्रकाश पाटील, दत्तात्रय हिरडे, रघुवीर जाधव, संतोष ठोंबरे, आबासाहेब भांड, विशाल झिंजाडे आदी यावेळी उपस्थित होते.

