करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ माढा पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज शिंदे यांनी करमाळा शहरात पदयात्रा काढत विजयी करण्याचे आवाहन केले आहे. आमदार शिंदे यांच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून ‘होम- टु-होम’ प्रचार करण्यावर भर देण्यात येत आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी गावभेट दौरे काढण्यावर भर दिला आहे. रोज सायंकाळी एक सभा व दिवसभर कॉर्नर बैठकांचे सत्र त्यांचे सुरु आहे. करमाळा शहरात नागेश कांबळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप व गणेश चिवटे यांच्या पाठींब्यानंतर वातावरण फिरले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून पदयात्रा काढून होम टू होम प्रचार केला जात आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी, विवेक येवले, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, जगदीश अग्रवाल, रितेश कटारिया, अभिषेक आव्हाड, प्रफुल शिंदे, नाना मोरे, दिग्विजय घोलप, संगीता नष्टे आदी उपस्थित होते.