hundred percent result of adoption in Bhigwan

करमाळा (सोलापूर) : भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. भिगवण विभागामध्ये श्रावणी कुदळे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.

2024 मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना विद्यालयांमध्ये टेस्ट सिरीज वेळेवर घेण्यात आल्या. बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा यासाठी तज्ञ मार्गदर्शकाला बोलवून त्यांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जात होत्या. तसेच प्रश्नपत्रिका संच सोडवून घेतले जात होते. शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न येथील शिक्षकांनी केला, अशी माहिती प्राचार्य सिंधु यादव यांनी दिली.

सेमी इंग्लिश विभागाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
कुदळे श्रावणी कृष्णा 96.80, गाडे मनस्वी मनोज 82, सूर्यवंशी सुहास नवनाथ 76.20 व इवरे ओमकार विठ्ठल 76.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयात प्रथम आलेल्या कुदळे या विद्यार्थिनीला समाजशास्त्र 99, गणित 99 ,विज्ञान 99, इंग्रजी 94, हिंदी 94, मराठी 91 एवढे गुण मिळाले आहेत.

इंग्लिश विभाग :
शिंदे श्रावणी श्रीपाद 92.20, गावडे अथर्वा जनार्दन 92, मानकर अंकिता नितीन 87.80 गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, सीईओ डॉ. विशाल बाबर, स्कूल विभागाच्या डायरेक्टर नंदा ताटे यांनी अभिनंदन केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *