करमाळ्यात सावंत गटाच्या वतीने इप्तार पार्टी

Iftar party on behalf of Sawant group at Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील जामा मस्जिद मध्ये सावंत गटाच्या वतीने इफ्तार पार्टी झाली. मुस्लिम धर्मामध्ये पवित्र समजला जाणारा रमजानचे औचित्य साधून माजी नगरसेवक संजय सावंत यांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी जामा मस्जिदमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सायंकाळी पावणे सात वाजता मौलानाच्या प्रार्थनेनंतर रोजा सोडण्यात आला.

सावंत गटाचे सुनील सावंत, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख संजय शिंदे, माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आझाद शेख, मुस्तकीन पठाण, जिशान कबीर, माजी नगरसेवक दीपक सुपेकर आदीजण उपस्थित होते.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

रोजा ईप्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, जामा मस्जिदचे विश्वस्त जमीर सय्यद, वाजीद शेख, साजीद बेग, आनंद रोडे, सागर सामसे, फिरोज बेग, अरबाज बेग, नागेश उबाळे, अकबर बेग, इम्रान घोडके, जहाँगीर बेग आदी जणांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *