करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातून आघाडी घेतली आहे. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. या फेरीत निंबाळकर यांना फक्त माणमधून आघाडी मिळाली आहे.
माढा, माळशिरस, सांगोला व फलठण येथे देखील मोहिते पाटील यांना आघाडी मिळाली आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना २१७५ तर मोहिते पाटील यांना २९७९, माढा विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना २६११ तर मोहिते पाटील यांना ४३८५, सांगोला विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ३८१२ तर मोहिते पाटील यांना ५२१०, माळशिरस विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना २६८३ तर मोहिते पाटील यांना ४३८४, फलठण विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ४३१६ तर मोहिते पाटील यांना ४५५६ व माण विधानसभा मतदारसंघात निंबाळकर यांना ४०४८ तर मोहिते पाटील यांना २७२९ मते पडली आहेत. मोहिते पाटील यांना पहिल्या फेरीत २४ हजार २४३ तर निंबाळकर यांना १९ हजार ६४५ मते पडली आहेत.