दत्तपेठ येथील दहिहंडी उत्सवाचे माजी आमदार जगताप यांच्या हस्ते उदघाटन

Inauguration of Dahihandi festival at Dattapeth by former MLA Jayvantrao Jagtap

करमाळा (सोलापूर) : दत्तपेठ येथे आज (मंगळवारी) श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री. श्रेणिक शेठ खाटेर युवा मंच, अमृतसिंग परदेशी मित्र परिवार यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवाचे उद्घघाटन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते झाले. करमाळ्यात गोविंदांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असून या उत्सवाला माजी आमदार जगताप यांनी भेट दिली आहे.

दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीला त्यांनी भेट दिली तेव्हा मंडळाने त्यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नानासाहेब मोरे, श्री. परदेशी, श्री. टांगडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व गोविंदाना माजी आमदार जगताप यांनी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *