करमाळा (सोलापूर) : शेटफळ (ना) येथील लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा मध्ये तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, तहसिलदार शिल्पा ठोकडे व मान्यवरांच्या हस्ते नागराज शेती मॉलचे उद्घाटन व नागराज दिनदर्शिकाचे प्रकाशन झाले.
लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये करमाळा तालुक्यातील केळी, ऊस, भाजीपाला व विविध पिकांमध्ये भरघोस उत्पादन घेणाऱ्या व उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, युनियन बँकेचे विभागीय प्रबंधक अतुल शेंडे, ग्रामसुधार समीतीचे अध्यक्ष ॲड. बाबूराव हिरडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश भाऊ करे पाटील, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक संतोष डांगे, मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
ठोकडे म्हणाल्या, शेटफळ येथील गट शेतीचा प्रयोग हा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. त्यांनी कृषी विभागाच्या व सरकारच्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत म्हणाले, सध्या शेती करायला परवडत नाही असा सूर दिसतो निश्चितच ही वस्तुस्थिती आहे. लोकसंखेमुळे शेतीचे लहान लहान तुकडे झाले. शेतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ राहत नाही. शेतीची अर्थव्यवस्था हा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असून यामध्ये धोरणात्मक आमोलाग्र बदल करण्याची गरज आहे.
प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष वैभव पवार यांनी केले. लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख, विठ्ठल पाटील महाराज, युनियन बँकेचे शाखाधिकारी मोहन कोरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे, धुळाभाऊ कोकरे, रामभाऊ पवार, दादासाहेब लबडे, पांडुरंग लबडे, अनिल पोळ, विलास लबडे, किरणं पोळ, नानासाहेब साळूंके, गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, विजय लबडे, विष्णू पोळ, राजेंद्र साबळे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार वैभव पोळ यांनी मानले.
‘या’ शेतकऱ्यांचा झाला सन्मान
सचिन गव्हाणे सचिन सरडे आदिनाथ राऊत (चिखलठाण नंबर एक), वैभव बोराडे (केडगाव), संतोष नाईकनवरे (शेटफळ), भाऊसाहेब राखुंडे (सोगाव पुर्व), किशोर रिटे (रिटेवाडी), महादेव काळोखे (उमरड), शिवाजी साखरे (राजुरी), सुदाम रणदिवे (सरफडोह).