करमाळा (सोलापूर) : उजनी जलाशय परिसरात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाची सध्या करडी नजर आहे. आज (गुरुवारी) बिटरगाव वा. परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने एका पथकाने पहाणी केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजली आहे. यामध्ये बंद असलेल्या काही बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत.
पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सामान्य प्रशासन तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलिस प्रशासन यांच्या पथकाने उजनी जलाशय परिसरात माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या 13 बोटी पकडल्या आहेत.